अभ्यासासाठी मार्गदर्शक तत्वे

एक विपश्यना शिबीर आपल्या जीवनामध्ये जर परिवर्तन आणेल तरच खऱ्या अर्थाने ते महत्वाचे असेल, आणि दैनिक प्रकारे ह्या विद्येचा अभ्यास करीत रहाल तेव्हाच परिवर्तन होईल. आपण काय शिकले आहे त्याची निम्नलिखित रुपरेखा ध्यानाच्या निरंतर सफलतेसाठी शुभकामनेसहित दिलेली आहे.

शील

दैनिक जीवनामध्ये ह्या पांच शीलांचे(उपदेश) पालन करुन अभ्यास केला जातो:

 • कोणत्याही प्राण्याची हत्या वर्ज आहे (हिंसा करु नका),
 • चोरी करणे वर्ज आहे,
 • लैंगीक दुराचार वर्ज आहे,
 • खोटे बोलणे वर्ज आहे,
 • सर्व मादक द्रव्ये वर्ज आहेत.


साधना(ध्यान)

अभ्यास चालू ठेवण्यासाठी न्यूनतम आवश्यकता:

 • सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास,
 • जेव्हा झोपण्यासाठी बिछान्यावर पडाल तेव्हा गाढ झोपण्याआधी पाच मिनिटे आणि जेव्हा सकाळी जाग येईल तेव्हा पाच मिनिटे
 • जर संभव असेल तर, आठवड्यातून एकदा विपश्यनाच्या ह्या विद्येचा अभ्यास करणाऱ्या अन्य साधकांबरोबर एक तास साधना करावी,
 • एक दहा दिवसीय शिबीर किंवा स्वयंशिबीर वर्षातून एकदा,
 • आणि ध्यानासाठी अन्य मोकळा वेळ असल्यास.
ध्यानाचा दैनिक अभ्यास कसा करावा:

आनापान

जर मन सुस्त किंवा अशांत असेल तर संवेदना जाणवणे कठीण जाते किंवा त्यावर प्रतिक्रिया न करणे अवघड होते. अशावेळी आपण आनापानापासून सुरु करु शकता आणि त्यानंतर विपश्यनेवर जाऊ शकतो किंवा,आवश्यकता असल्यास पूर्ण एक तासभर श्वास पहाणे सुरु ठेवू शकता.आनापानाच्या अभ्यासासाठी नाकाच्या खाली आणि वरच्या ओठाच्या वरील क्षेत्रावर ध्यान केंद्रित करा. प्रत्येक श्वास कसा येतो व कसा जातो ह्यावर लक्ष्य केंद्रित करा. जर मन खूपच सुस्त किंवा अशांत असेल तर काही वेळासाठी जाणुनबूजून थोडासा जोराने श्वास घ्या. अन्यथा श्वास घेणे सहज स्वाभाविक असले पाहिजे.

विपश्यना

शरीराच्या अंग अंगामध्ये जी काही संवेदना जाणवेल त्याची जाणीव ठेवून डोक्यापासून पायापर्यंत व पायापासून डोक्यापर्यंत क्रमवार जात पूर्ण शरीराचे निरिक्षण करा. संवेदनेचा जो काही अनुभव असेल,कोणताही सुखद, दुखद,अप्रिय किंवा तटस्थ, त्यांच्या नश्वर स्वभावाला ओळखून निःष्पक्ष निरिक्षण करा; म्हणजेच सर्व संवेदनांप्रती समता ठेवा. आपले ध्यान सतत पुढे पुढे फिरत ठेवा. कधीही कोणत्याही एका जागी काही मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबू नका. अभ्यास यंत्रवत होऊ देवू नका. आपल्या अनुभवावर आधारित संवेदनेच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रकारे काम करा. शरीराच्या ज्या भागामध्ये विभिन्न स्थूल संवेदना जाणवीत असतील तेथे वेग वेगळे करुन त्या भागांवर ध्यान द्या. त्याच प्रकारच्या सूक्ष्म संवेदना असलेले सारखे भाग जसे कि दोन्ही हात किंवा दोन्ही पाय आपण एकाच वेळी आपण पाहू शकतो. जर आपल्यास पूर्ण शरीरभर सूक्ष्म संवेदनेचा अनुभव येत असेल तर एकाच वेळी पूर्ण शरीरावर लक्ष्य केंद्रित करा व त्यानंतर पुन्हा वेग वेगळ्या भागावर काम करीत रहा.

एका तासा नंतर कोणतिही मानसिक किंवा शारीरिक अशांती संपण्यासाठी आराम करा. त्यानंतर काही मिनिटांसाठी शरीरावरील सूक्ष्म संवेदनेवर आपले ध्यान केंद्रित करा,आणि सर्व प्राण्यांसाठी विचार व सद्भावना ह्यां भावनेने आपले मन व शरीर भरुन टाका.


साधना काळा अतिरिक्त

आपण प्रथम कोणतेही महत्वपूर्ण काम करताना आपले लक्ष अविभाजित असावे, परंतू वेळोवेळी सजगता आणि समता आहे की नाही ह्याची पडताळणी करा. जेव्हा काही समस्या उत्पन्न होते,तेव्हा जर शक्य असेल तर आपला श्वास किंवा संवेदने वर काही सेकंद ध्यान द्या. हे भिन्न भिन्न स्थितिमध्ये संतुलित रहाण्यास आपल्यास मदत करेल.

दान

जे काही चांगले प्राप्त केले आहे ते दुसऱ्यांबरोबर वाटा. असे करण्याने स्वयंकेंद्रिततेची जुनी सवय काढून टाकण्यामध्ये मदत होते. साधकांना असे समजून चुकते कि धम्म वाटणे हे सर्वात महत्वपूर्ण आहे. शिकविण्यासाठी सक्षम नसले तरी ते जे काही करु शकतात ते म्हणजे दुसऱ्याना शिकण्यास मदत करणे. ह्या शुध्द इच्छेनुसार ते दुसऱ्या साधकांच्या खर्चासाठी दान देतात.

हे दान  हेच विश्वभरांतील शिबीरे आणि केंद्रे चालवण्यासाठी वित्त मिळण्याचा एकमात्र  स्रोत आहे.


निःस्वार्थ सेवा

शिबीर आयोजित करण्यासाठी किंवा चालविण्यासाठी मदत करणे किंवा धम्माचे दुसरे काम करणे ह्यासाठी आपला वेळ आणि प्रयास देणे हे सुद्धा मोठे dāna(दान) आहे. ह्या बदल्यात काही मिळण्याची अपेक्षा न ठेवता ते सर्व जे  मदत म्हणून (आचार्य आणि  साहाय्यक आचार्यसहित) dāna दानाच्या रूपामध्ये त्यांची सेवा देत असतात. ह्या सेवेमुळे फक्त दुसऱ्यानाच लाभ मिळत नाही, तर  जे सेवा देत आहेत त्या लोकांनासुद्धा धर्म खोलवर समजण्यासाठी व ह्या प्रकारे ह्या मार्गावर पुढे जाण्यासाठी आपला अहंकार काढून टाकण्यास मदत होते.


फक्त एकच मार्ग

दुसऱ्या अन्य विद्येबरोबर ह्या तंत्राचे मिश्रण करु नका. जर आपण काही वेगळा अभ्यास करीत असाल तर कोणती विद्या आपल्यास पसंत आहे ते निवडण्यासाठी मदत म्हणून दोन किंवा तीन विपश्यना शिबीरामध्ये आपण सामील होऊ शकतो. त्यानंतर जी सर्वांत उपयुक्त आणि लाभकारी वाटेल ती निवडा, आणि आपण त्यास समर्पित व्हा.


विपश्यने बद्दल दुसऱ्याना सांगणे

आपण दुसऱ्या लोकाना ह्या विद्येची माहिती देऊ शकाल, परंतू त्याना शिकवू नका, अन्यथा मदत करण्या ऐवजी आपण त्यांच्यामध्ये भ्रम उत्पन्न कराल, जेथे प्रशिक्षित मार्गदर्शक असतात तेथे शिबीरामध्ये सामिल होऊन ध्यान करु इच्छितात अशा लोकांना प्रोत्साहित करा.


सामान्यतः

प्रगति हळू हळू होत असते. चुका होतच असतात- त्यापासून शिका. जेव्हा आपल्यास समजते की आपल्या कडून चुक झाली आहे, तेव्हा मंदस्मित करा आणि पुन्हा सुरु करा!

साधनेच्या वेळी सुस्तपणा,अशांती, मन भटकणे व दुसऱ्या विघ्नांचा अनुभव होणे ही एक सर्वसाधारण गोष्ट आहे. परंतू जर आपण दृढ राहिलात तर आपणास सफलता मिळेल.

मार्गदर्शनासाठी आचार्य किंवा सहाय्यक आचार्य यांच्याशी संपर्क करण्यासाठी आपले स्वागत आहे.

आपल्या बरोबरच्या साधकांच्या सहाय्याचा उपयोग करा. त्यांच्या बरोबर बसल्यामुळे आपल्यामध्ये शक्ति येईल.

केंद्रावर किंवा धम्म घरी जाऊन जेव्हा वेळ असेल तेव्हा, काही दिवस किंवा काही तास बसून ध्यान वातावरणाचा लाभ घ्यावा. एक जुना साधक ह्या नात्याने आपण फक्त विपश्यना विद्येचाच अभ्यास करत आहात असे समजून आणी शिबीरामध्ये जागेची उपलब्धता असल्यास दहा दिवशीय शिबीरामध्ये काही दिवस भाग घेण्यासाठी आपले स्वागत आहे.

प्रत्येक अनुभव अनित्य आहे असे ओळखणे व त्याचा स्विकार करणे हेच खरे ज्ञान आहे. ह्या अंतर्दृष्टि मुळे आपण उतार चढाव आल्यास घाबरुन जाणार नाही. आणि जेव्हा आपण एक आंतरिक संतुलन ठेवण्यात सक्षम व्हाल तेव्हा अशी गोष्ट निवडाल की ज्यामुळे स्वतःसाठी व दुसऱ्यासाठी सुख उत्पन कराल. समतापूर्ण मनाने प्रत्येक क्षण आनदी रहाण्याने सर्व दुःखापासून मुक्तिच्या अंतिम लक्ष्यापर्यंत जाण्यास आपण निश्चितच प्रगती कराल.


पुन्हा पुन्हा वापरल्या जाणाऱ्या संज्ञा

खाली दिलेली शब्दावली अधिकांश पाली भाषे मधून घेतली आहे आणि रोमन पाली संकेत लिपी मध्ये येथे सुचीबध्द आहे.दुर्भाग्याने,अक्षरांची उचित विशेषक चिन्हे सामिल करण्यासाठी ह्या माध्यमाच्या सीमा हे अशक्य करते. खऱ्या उच्चाराच्या सुविधेसाठी एकाद्यास ज्यामध्ये ही चिन्हे आहेत अशा दुसऱ्या मुद्रित स्रोताशी परामर्श केला पाहिजे.

तीन प्रशिक्षण:

 • शील-नैतिकता
 • समाधि-एकाग्रता, मनाला वश करणे
 • पन्ना-ज्ञान, अंतर्दृष्टी जी मनाला शुद्ध करते

तीन रत्न:

 • बुद्ध -अशी व्यक्ति जी पूर्ण प्रकारे प्रबुध्द आहे
 • धम्म -प्रकृति((निसर्ग) चे नियम; एक प्रबुद्ध व्यक्ति ची शिकवण; मुक्ति चा मार्ग
 • संघ -कुणीही ज्याने धम्माचे आचरण केले आहे व शुद्ध चित्त, संत व्यक्ति बनली आहे

सर्व मानसिक मलिनतेची तीन मूळे:

 • राग / लोभ-आसक्ती
 • दोष-द्वेष
 • मोह-अज्ञान

आर्य अष्टांगिक मार्ग:

 • सम्मा-वाचा-सम्यक वाणी
 • सम्मा-कम्मन्ता-सम्यक कर्म
 • सम्मा-आजिवा-सम्यक आजिविका
 • सम्मा-वयामा-सम्यक प्रयास/प्रयत्न
 • सम्मा-सती-सम्यक सजगता
 • सम्मा-समाधि-सम्यक एकाग्रता
 • सम्मा-संकप्पा-सम्यक संकल्प
 • सम्मा-दिठ्ठी-सम्यक दृष्टी
निब्बाण -अवर्णनीय, परम सत्य जे मन आणि शरीर यांच्या पलीकडे आहे (संस्कृतमध्ये निर्वाण)

 

ज्ञानाचे तीन प्रकार:

 • सुत---मय पन्ना - दूसऱ्याकडून ऐकण्यातून मिळालेले ज्ञान
 • चिंता--मय पन्ना -बौद्धिक, विश्लेषणात्मक समज
 • भावना-- मय पन्ना - प्रत्यक्ष व्यक्तिगत अनुभवाच्या आधारावर मिळालेले ज्ञान

प्रपंचाची तीन लक्षणे:

 • अनिच्चा -अनिच्च(अनित्य)
 • अनत्ता -अहंभावरहित
 • दुःख -क्लेश/पीडा

कम्मा कार्य; विशेषतः असे कार्य ज्याचा परिणाम/प्रभाव भविष्यामध्ये त्या व्यक्तीवर  पडेल (संस्कृतमध्ये कर्म )

चार आर्य सत्य:

 • दुःखाचे सत्य
 • दुःखाचे मूळ (आसक्ति)
 • दुःख निरोध
 • दुःख निरोधाचा मार्ग

पांच समुच्चय ज्याच्याने मनुष्य प्राणी बनलेला आहे:

 • रूप - परमाणुच्या कणांनी बनलेले शरीर (कलापा)
 • विज्ञान - चेतना, बोध(जाणीव)
 • सन्ना(संज्ञा) -अनुभूती, ओळखणे
 • वेदना -संवेदना
 • संखारा -प्रतिक्रिया; मानसिक कंडीशनिंग

चार भौतिक तत्व:

 • पृथ्वी -भूमि (घनता, वजन)
 • आप -जल (प्रवाही, संसक्ति)
 • वायू हवा (वायुरुप, गति)
 • तेजो अग्नि (तापमान)

   पांच बाधा किंवा दुश्मन:

  • कामछंद -राग(आसक्ति)
  • व्यापाद -द्वेष
  • थिन--मिद्ध -शारीरिक सुस्ती आणि मानसिक सुस्ती
  • उध्धच्च-कुक्कुच्च -अशांति आणि चिंता
  • विचिकित्सा -शंका, अनिश्चितता

   पांच बल किंवा मित्र:

  • श्रध्दा -विश्वास
  • वीर्य -प्रयत्न/प्रयास
  • सती -सजगता
  • समाधि -एकाग्रता
  • पन्ना(प्रज्ञा) - ज्ञान 

  विषय उत्पन्न होण्याची चार कारणेः

  • आहार
  • पर्यावरण / वातावरण
  • वर्तमान मानसिक प्रतिक्रिया
  • पूर्वीची मानसिक प्रतिक्रिया

  शुद्ध मनाचे चार गुण:

  • मेत्ता(मैत्री) -निःस्वार्थ प्रेम
  • करुणा - दया
  • मुदिता -सहानुभूतीपूर्ण खुशी
  • उपेक्षा -समता

  सतिपठ्ठान सजगतेची स्थापना; विपश्यना साठी प्रतिशब्द

  चार सतिपठ्ठान आहेत:

  • कायानुपश्यना -शरीराचे निरीक्षण
  • वेदनानुपश्यना - शारीरिक संवेदनेचे निरीक्षण
  • चित्तानुपश्यना -मनाचे निरीक्षण
  • धम्मानुपश्यना - चित्तवृत्तीचे निरीक्षण

  दहा पारमी(पुण्य) किंवा मानसिक पूर्णता:

  • नेक्खमा -निष्क्रमण
  • शील -नैतिकता(सदाचार)
  • वीर्य -प्रयत्न/प्रयास
  • खन्ती -सहनशीलता
  • सच्च -सत्यवाद(प्रामाणिक)
  • अधिठ्ठान - दृढ़ संकल्प
  • पन्ना/प्रज्ञा -ज्ञान
  • उपेक्खा(उपेक्षा) -समता
  • मेत्ता(मैत्री) -निःस्वार्थ प्रेम
  • दाना -औदार्य; दान

  भवतु सब्ब मंगलं  सर्व  प्राणी सुखी होवोत!

  साधु, साधु, साधु - चांगले सांगितले, चांगले केले; आम्ही सहमत आहोत, ह्या इच्छेमध्ये आम्ही भागीदार आहोत


  गोयंकाजीं कडून एक संदेश

  धम्ममार्गावरील प्रिय यात्री
  मंगल असो!
  धम्माची मशाल प्रज्वलित ठेवा! तिच्या प्रकाशात  आपले दैनंदिन जीवन प्रकाशमय होवो. नेहमीच लक्षात ठेवा की धम्म हे एक पलायन नाही.ही जीवन जगण्याची कला आहेः शांती व सद्भावपूर्वक स्वतः आणि  अन्य लोकांसहित जीवन जगण्याची कला.
  म्हणूनच,धम्म जीवन जगण्याचा प्रयत्न करा.
  दररोज सकाळी व संध्याकाळी आपला दैनिक अभ्यास करण्यास विसरू नका.
  जर शक्य असेल, तर दुसऱ्या विपश्यना साधकांबरोबर साप्ताहिक सामुहिक साधनेमध्ये भाग घ्या.
  एक वार्षिक दहा दिवसीय शिबीर करा. हे आपल्यास मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
  आत्मविश्वासाने आपण आजूबाजूच्या कांट्याना बहादूरीपूर्वक आणि हसत सामोरे जा.
  घृणा आणि द्वेष सोडून द्या. त्यामुळे शत्रुता संपून जाईल.
  लोकाना विशेषतः ज्यांना धम्म समजलाच नाही आणि दुःखी जीवन जगत आहेत, अशा प्रति प्रेम व करुणा उत्पन्न करा.
  आपल्या धम्म व्यवहारामुळे त्यांना शांती आणि सौहार्दाचा मार्ग दिसावा. आपल्या चेहऱ्यावरील धम्माची चमक खऱ्या सुखाच्या ह्या मार्गावर अधिकात अधिक दुःखी लोकाना आकर्षित करो.
  सर्व प्राणी सुखी,शांतीपूर्ण, मुक्त होवोत.
  माझ्या सर्व मंगलमैत्रीसहित,
  एस एन गोएन्का