प्रवचन सारांशावरील प्रस्तावना आणि टीप

प्रस्तावना

“मुक्ति चर्चेने कधीच नव्हे, तर केवळ अभ्यासाद्वारेच प्राप्त होऊ शकते,” असे एस एन गोयंकाजीने म्हटले आहे. विपश्यना ध्यान शिबीर मुक्तिसाठी ठोस पाऊल उचलण्याची एक संधी प्राप्त करुन देते. ह्या प्रकारच्या शिबीरामध्ये भाग घेण्यामुळे सहभागी हे शिकतो की जे मनामध्ये तणाव व पूर्वग्रह दैनंदिन जीवनाच्या प्रवाहात व्यत्यय आणतात त्यांना कसे दूर करावे. असे करण्याने एकजण प्रत्येक क्षण शांतीपूर्वक, उत्पादनक्षम,सुखाने कसे जगावे हे समजू लागते. त्याच वेळी एकजण, ज्याची मानवजात कामना करते त्या उच्चतम लक्ष्याकडे प्रगती करणे सुरु करतोः मनाची पवित्रता, सर्व दू;खापासून मुक्ति, पूर्ण ज्ञान

फक्त याबद्दल विचार करण्याने किंवा त्याची इच्छा करण्याने यांपैकी काहीही मिळत नाही. एखाद्याने ह्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. ह्याच कारणामुळे, विपश्यना शिबीरामध्ये नेहमीच वास्तविक अभ्यासावर जोर दिला जातो. कोणत्याही दार्शनिक वादास, सैध्दांतिक तर्क, एखाद्याच्या अनुभवाशी असंबंधित प्रश्न विचारण्यास परवानगी दिली जात नाही. जर संभवनीय असेल तर, साधकाने आपल्या मधील स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे स्वतःच आपल्यातच शोधावीत यासाठी प्रोत्साहन दिले जाते. आचार्य जे काही मार्गदर्शन अभ्यासासाठी आवश्यक असेल ते करतात, परंतु ह्या मार्गदर्शनाचे अनुपालन करणे प्रत्येक व्यक्तिवर अवलंबून असतेः एखाद्यास आपल्या मुक्तिसाठी स्वतःच प्रयत्न केले पाहिजेत,आपली लढाई स्वतःच लढली पाहिजे.

ह्यावर जोर देताना, आता सुध्दा अभ्यासासाठी स्पष्टिकरणाचे काही संदर्भ देणे आवश्यक आहे. म्हणूनच शिबीरामध्ये रोज संध्याकाळी गोयंकाजी त्या दिवसाच्या अनुभवाचे यथार्थ दर्शन व्हावे व तंत्राचे विभिन्न आयाम स्पष्ट करण्यासाठी एक “धम्म प्रवचन” देतात. ही प्रवचने, बौध्दिक किंवा भावनात्मक मनोरंजनाच्या इराद्याने नाहीत असे ते बजावतात.साधकाने काय करावे आणि का करावे हे समजण्यास मदत व्हावी हाच ह्यांचा उद्देश आहे, म्हणजे ते योग्य प्रकारे काम करतील व सुपरिणाम प्राप्त करु शकतील.

ही प्रवचने संक्षिप्त स्वरुपामध्ये येथे प्रस्तुत केली आहेत.

ही अकरा प्रवचने बुध्दाच्या शिक्षणाचा एक व्यापक सिंहावलोकनाची पूर्तता करतात. तथापि, ह्याचा दृष्टिकोन विद्वत्ता किंवा विश्लेषणात्मक नाही. त्या ऐवजी ह्या शिकवणीचा एका ध्यानीला उलगडा व्हावा यासाठी प्रस्तुत केली आहेतः एक गतिशील, सुसंगत पूर्णता. सर्व विभिन्न पैलू, अंतनिर्दित एकतेची पुष्टी करतातः तो म्हणजे ध्यानाचा अनुभव. हा अनुभव म्हणजे आंतील अग्नी आहे जो धम्माच्या रत्नाला सत्य जीवन व प्रतिभा देतो. ह्या अनुभवाशिवाय कुणीही प्रवचनामध्ये किंवा वास्तविकतः बुध्दाच्या शिकविण्याबद्दल काय सांगितले गेले आहे त्याचे पूर्ण महत्व आकलन करु शकणार नाही. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की त्या शिकवणीच्या बौध्दिक प्रशंसेला कोणतीही जागा नाही.बौध्दिक समज, ध्यानाच्या अभ्यासासाठी एक सहाय्य म्हणून मूल्यवान आहे, जरी ध्यान करणे ही एक प्रक्रिया आहे जी बुध्दीच्या सीमेपलिकडे आहे. ह्या कारणामुळे प्रत्येक प्रवचनातील आवश्यक मुद्दा लक्षात ठेवून संक्षिप्त रुपात हा सारांश तयार केला गेला आहे. ती प्रवचने अशा लोकांसाठी आहेत जे स,ना.गोएंका द्वारा शिकविल्या जाणाऱ्या विपश्यनेचा अभ्यास करीत आहेत त्यांना प्रेरणा व मार्गदर्शन करण्याच्या प्रमुख उद्देशासाठी केली आहेत. जे लोक हे वाचतील अशा दुसऱ्या लोकांकडून ही आशा आहे, की ते एका विपश्यना शिबीरामध्ये आणि येथे वर्णन केल्या गेलेल्या अनुभवासाठी भाग घेण्यासाठी प्रोत्साहित होतील.

हा सारांश विपश्यनेच्या दहा दिवसाच्या बदली आपणहून शिकण्यासाठी एक क्रमिक पुस्तक म्हणुन समजू नये. ध्यान हा एक गंभीर विषय, विशेषतः विपश्यना तंत्र/विद्या, जे मनाच्या खोलीशी/गहराईशी संबंधित आहे. ह्याला हलकेपणे किंवा सहजपणे घेऊ नका. विपश्यना शिकण्याचा योग्य प्रकार म्हणजे जेथे साधकासाठी योग्य वातावरण व प्रशिक्षित मार्गदर्शक असेल अशा ठिकाणी औपचारिक शिबीरामध्ये सामील होणे. जर कुणी ह्या ताकिदीची उपेक्षा करुन स्वतःच ह्याबद्दल वाचल्यामुळे विद्या/तंत्र शिकविण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या जोखमी वर तो ते करेल. सौभाग्याने स.ना.गोएंका द्वारे शिकविले गेलेल्या विपश्यना ध्यानाची शिबीरे संपूर्ण विश्वामध्ये अनेक भागात नियमित भरविली जातात. ह्याचे माहितीपत्रक येथून ऑनलाइन उपलब्ध होऊ शकेल.

हा सारांश शेलबर्ने फॉल्स,मॅसाचुएट्स, संयुक्त राज्य अमेरिका मध्ये ऑगस्ट 1983 च्या दरम्यान विपश्यना ध्यान केंद्रामध्ये श्री.गोएंकाजीनी दिले गेलेल्या प्रवचनावर प्रमुखतः आधारीत आहे. अपवाद फक्त दहा दिवसांचा सारांश, जो ऑगस्ट 1984 मध्ये त्याच केंद्रावर दिले गेलेल्या प्रवचनावर आधारीत आहे.

जरी श्री.गोएंकाजीनी हा मजकूर पाहून प्रकाशनासाठी मंजूरी दिली आहे, तरी त्यांना बारकाईने ह्या मजकूराचे परीक्षण करण्यासाठी वेळ मिळाला नाही, त्यामुळे वाचकास काही चुका आणि विसंगत्या मिळू शकतात.ही जबाबदारी न आचार्यांची आहे, ना शिक्षणाची,परंतु माझी. टीकेचे मनःपूर्वक स्वागत आहे. जी मजकूरामधील असे दोष दूर करण्यासाठी मदत करील.

ह्या कामामुळे धम्माच्या अभ्यासामध्ये अनेकांना मदत मिळो.

सर्वांचे मंगल होवो.

विलियम हर्ट


प्रवचन सारांशाच्या संहितेवर टीप

बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांचे विचार, जे गोएंकाजीनी उध्दृत केले आहेत ते अनुशासन संग्रह (विनय-पिटक) आणि पाली व्यवस्थापनेचे (सुत्त-पिटक) प्रवचन या मधून घेतले आहेत.(पुष्कळ अवतरणे दोन्ही संग्रहामध्ये दिसतात,तरीसुध्दा,अशा वेळेस फक्त सुत्त संदर्भच येथे दिले आहेत.) येथे अधिकृत पाली साहित्याच्या नंतरची काही उदाहरणे दिली आहेत.ह्या प्रवचनांमध्ये, गोएंकाजीनी ह्या अवरणांचा पाली भाषेचा शब्दशः भाषांतर करण्याऐवजी भावानुवाद केला आहे. प्रत्येक अवतरणांचा सार साध्या भाषेमध्ये देण्याचा हाच उद्देश आहे की विपश्यना साधनेच्या अभ्यासावरील त्याच्या संबंधावर जोर देता यावा.

जेथे पाली अवतरण सारांश रुपामध्ये दिसतील, तेथे जे स्पष्टीकरण दिले आहे ते गोएंकाजींनी दिलेले प्रवचन आहे,ज्यावर हा सारांश आधारित आहे. ह्या दस्तऐवजा मध्ये,  पाली अनुभागाचे इंग्लिश अनुवादा मध्ये, उद्घृत केलेल्या अवतरणाची अधिक स्पष्ट व्याख्या देऊन, आतासुध्दा एका साधकाच्या दृष्टिकोनाला बळ देण्याचा हा प्रयत्न आहे. दुर्भाग्याने, ह्या सिमीत माध्यमाचा फॉन्ट पाली शब्दांचे आवश्यक उद्धृत चिन्ह जे येथे रोमन लिपीमध्ये दिले आहेत ते दाखविणे अशक्य आहे.

सारांशाच्या संहितेमध्ये,पाली शब्द कमीत कमी आवश्यक उपयोगासाठी ठेवले गेले आहेत. जेथे अशा शब्दांचा वापर केला आहे, त्यांचे बहुवचन अनुरुपतेसाठी पालीमध्ये दिली गेली आहेत.