सातव्या दिवसाचे प्रवचन

सूक्ष्म व त्याचबरोबर स्थूल संवेदना प्रति समतेचे महत्व – सजगतेची निरंतरता –पांच मित्र –विश्वास,प्रयत्न,सजगता,एकाग्रता,ज्ञान

सात दिवस समाप्त झालेः आता आपल्यास काम करण्यासाठी आणखी तीन दिवस उरले आहेत. समजदारीने अभ्यास कसा करावा हे समजून मोठ्या मेहनतीने व निरंतरतेने काम करुन ह्या उर्वरित दिवसांचा सर्वात चांगला उपयोग करा.

तेथे तंत्रामध्ये दोन गोष्टी आहेतः सजगता व समता. शरीराच्या चौकटीत ज्या संवेदना उत्पन्न होत आहेत त्याप्रती सजगतेचा विकास करणे, त्याचबरोबर त्याचवेळी संवेदने प्रति त्याने समता ठेवली पाहिजे. समता ठेवल्याने स्वाभाविकपणे आता किंवा नंतर, ज्या मूर्च्छित भागामध्ये संवेदना मिळत नव्हत्या तेथे त्या प्रकट होणे सुरु होइल, आणि स्थूल,घनिभूत,अप्रिय संवेदना सुक्ष्म संवेदनेमध्ये बदलणे सुरु होइल. एकास पूर्ण शरीरभर ऊर्जेचा पुष्कळच सुखद प्रवाह अनुभव येण्यास सुरुवात होईल.

जेव्हा एखादा ज्यामध्ये सुखद संवेदना आहेत त्या दिशेने काम करताना, त्यालाच लक्ष्य समजेल, तर त्यामुळे धोका उत्पन्न होईल. वास्तवामध्ये, विपश्यनेचा अभ्यास करण्याचा उद्देश खास संवेदनेच्या प्रकाराचा अनुभव याबा हा नाही, तर सर्व संवेदनांसाठी समता विकसित करणे हा आहे. संवेदना नेहमी बदलत रहातात, मग कोणत्याही स्थूल किंवा सूक्ष्म असोत. ह्या मार्गावरील प्रगती मोजण्याचा एकच मापदंड आहे तो म्हणजे संवेदनेप्रती किती समता आहे हा.

पूर्ण शरीरामधील धाराप्रवाहाच्या अनुभवानंतर देखील एकास हे संभवनीय आहे की पुन्हा एकदा स्थूल संवेदना किंवा कोणताही मूर्च्छित भाग अनुभवास येऊ शकतो. हे एक प्रतिगमन नाही, तर प्रगती होत असल्याचा संकेत आहे. जेव्हा एकजण सजगता व समतेचा विकास करतो,स्वाभाविकपणे तो अचेतन मनाच्या खोलवर प्रवेश करतो, आणि तेथे लपून बसलेल्या दुषिततेस उघडे पाडून वर आणतो.जोपर्यंत त्या खोलवर पडून असलेल्या दुषितता बेशुध्दावस्थेत असतात,तो पर्यंत त्या भविष्यामध्ये दुःख उत्पन्न करणारच. त्यांना संपविण्यासाठी त्याना मनाच्या वरील स्तरावर येउ देणे आणि नष्ट होऊ देणे हा एकच मार्ग आहे. जेव्हा अशी खोल मुळेवाले saṅkhārā(संस्कार) वरील स्तरावर उत्पन्न होतात, त्यामधील काही शरीरामध्ये अप्रिय, स्थूल संवेदना किंवा मूर्च्छित भागासहित असू शकतात. एखाद्याने कोणत्याही प्रतिक्रियेशिवाय त्याचे निरिक्षण सुरु ठेवले तर त्या संवेदना नष्ट होतात, त्याचबरोबर संखार(संस्कर) ज्यांच्यामुळे त्या प्रकट झाल्या आहेत तेही नष्ट होतात.

प्रत्येक संवेदना, स्थूल किंवा सूक्ष्म असो नश्वरतेचे द्योतक आहे. एक स्थूल संवेदना उत्पन्न होते आणि वाटते की काही काळ ही टिकेल, परंतु आता किंवा काही काळाने ती नष्ट होतेच होते. सूक्ष्म संवेदना उत्पन्न होतात आणि शीघ्र गतीने नष्ट होतात, परंतु आता सुध्दा त्यामध्ये तीच विशेषता आहे. कोणतीही संवेदना शाश्वत नाही. म्हणुनच कोणत्याही संवेदनेसाठी पसंती किंवा पूर्वग्रह ठेवता कामा नये. जेव्हा एखादी स्थूल, अप्रिय संवेदना उत्पन्न होते तेव्हा एकजण उदास न होता त्याचे अवलोकन करतो. जेव्हा एक सूक्ष्म, सुखद संवेदना होते, तेव्हा तो त्याचा स्विकार करतो, येथपर्यंत की प्रफुल्लित होते त्याला चिकटून न ठेवता त्याचा आनंद घेतो. प्रत्येक वस्तुस्थितीमध्ये तो सर्व संवेदनेच्या नश्वर स्वभावाला समजतो; त्यामुळेच तो जेव्हा त्या उत्पन्न होतात व नष्ट होतात तेव्हा मंद स्मित करु शकतो.

आपल्या जीवनामध्ये खरे परिवर्तन आणण्यासाठी शारीरिक संवेदनेच्या स्तरावरच समतेचा अभ्यास केला गेला पाहिजे. प्रत्येक क्षणामध्ये शरीराच्या आंत संवेदना उत्पन्न होतात. साधारणपणे चेतन मन त्यापासून अनभिज्ञ असते, परंतू अचेतन मनाला संवेदना जाणवतात आणि त्याप्रती ते राग(आसक्ति) किंवा द्वेष याची प्रतिक्रिया करत रहाते. जर मनाला शरीराच्या चौकटीच्या आंत जे काही होत आहे त्याबद्दल पूर्ण सजगता आणि त्याच वेळेस समता ठेवण्यासाठी प्रशिक्षित केले गेले तर,आंधळेपणे प्रतिक्रिया करण्याची त्याची सवय तुटते. प्रत्येक स्थितिमध्ये समता कशी ठेवावी हे एकजण शिकतो,आणि त्यामुळे तो एक संतुलित,सुखी जीवन जगू शकतो.

हा प्रपंच कसे काम करतो, हा दुःख कसे उत्पन्न करतो ह्याचा स्वतःच्या बद्दल सत्याचा अनुभव घेण्यासाठी आपण येथे आला आहात. मानविय प्रपंचाचे दोन पैलू आहेतः भौतिक व चैतिक,शरीर व मन. एकास ह्या दोन्ही गोष्टीवर ध्यान दिले पाहिजे. परंतू वास्तवामध्ये संवदनेच्या माहिती शिवाय शरीरामध्ये काय होत आहे त्याचा आपण अनुभव करु शकत नाही. ह्याच प्रकारे मनाला मनामध्ये काय उत्पन्न होत आहे हे वेगळेपणाने पाहू शकत नाही म्हणजेच विचाराशिवाय. जसा एकजण मन व शरीराच्या सत्याचा खोलवर अनुभव घेतो, तेव्हा हे स्पष्ट होते की जेव्हा मनामध्ये काही उत्पन्न होते त्याच बरोबर शारिरीक संवेदना देखील उत्पन्न होतात. शरीर आणि मन ह्या दोघांच्या सत्याचा अनुभव करण्यामध्ये संवेदना अतिशय महत्वपूर्ण आहे, आणि ह्या स्थानापासूनच प्रतिक्रिया सुरु होतात. आपल्यामधील सत्याच्या निरिक्षणासाठी व मानसिक दुषितता उत्पन्न होणे थांबविण्यासाठी कुणालाही संवेदने बद्दल माहिती असली पाहिजे आणि सतत अधिकात अधिक वेळ समतेमध्ये टिकून राहिले पाहिजे.

ह्या कारणामुळे, शिबीराच्या उरलेल्या दिवसामध्ये आपण ध्यानाच्या वेळेस डोळे बंद ठेवून सतत काम कले पाहिजे; तसेच विश्रामाच्या वेळी देखील आपणास संवेदनेच्या बद्दल सजगता व समता बाळगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चालताना,खाताना,पिताना,किंवा स्नान करताना जे काम करतो ते नेहमीप्रमाणे करावे; परंतु आपले काम(ध्यान) यांत मंदपणा येऊ देऊ नका.शरीराच्या हालचालीबद्दल जाणीव ठेवा, आणि त्याच वेळी संवेदनेची देखील, जर संभवनीय असेल तर शरीराचा जो भाग गतीशील आहे त्यावर, नाहीतर दुसऱ्या अन्य भागावर. सजगता आणि समता कायम ठेवा.

ह्याच प्रकारे, जेव्हा आपण रात्री बिछान्या वर पडाल, तेव्हा डोळे बंद करा आणि शरीराच्या आत कुठेही संवेदना पहा. जर आपण ह्या जाणीवेसहित झोपून जाल, तर स्वाभाविकपणेच जेव्हा आपण उठाल,तेव्हा आपल्यास संवेदनेची सजगता असेल. कदाचित आपल्यास गाढ झोप आली नाही,किंवा आपण रात्रभर जागत राहिला. हे चांगलेच असेल जर आपण बिछान्यावर पडून असताना, सजगता व समता ठेवत असलात तर. शरीराला आवश्यक असलेला आराम त्यामुळे मिळतो,आणि मनाला तर सजगता व समता ह्यामध्ये रहाणे ह्याशिवाय दुसरा कुठलाही मोठा आराम नाही. तथापि,जर आपण ह्याची चिंता सुरु केली की आपल्यास निद्रानाश सुरु झाला आहे असे समजून,नंतर आपणास तणाव उत्पन्न होईल आणि दुसऱ्या दिवशी थकल्यासारखे जाणवेल. पूर्ण रात्रभर बसलेल्या स्थितीमध्ये,ना ही आपण जबरदस्तीने जागत रहाण्याचा प्रयत्न देखील करु नका; हे एक टोक गाठण्यासरखे होईल. जर झोप आली तर पुष्कळच चांगले; झोपून जा. जर झोप आली नाही तर शरीरास आडव्या स्थितीमध्ये आराम करु द्यावा, आणि सजगता व समता ठेवून मनाला आराम द्यावा.

बुध्दांने सांगितले,” जर कोणी साधक संवेदनेप्रती एक क्षणभर देखील सजगता न घालविता समता ठेवून कठोरपणे अभ्यास करेल तर अशी व्यक्ति संवेदनेस पूर्णपणे समजून ज्ञानाला विकसित करेल.” साधकास कळून येते की ज्यांच्यामध्ये ज्ञानाचा अभाव आहे,तो कशी प्रतिक्रिया करत राहतो आणि आपले दुःख वाढवत रहातो. साधकास हेदेखील समजते की कसे एकजण सर्व संवेदनेचा नश्वर स्वभाव ध्यानात ठेवून त्या प्रति प्रतिक्रिया करणार नाही,आणि दुःखातून बाहेर येईल. बुध्दांनी बोलणे सुरु ठेवले,” हे सर्व पूर्णपणे समजून, साधक मन व शरीरा पलिकडचा nibbāna(निब्बाण) चा अनुभव करण्यास सक्षम होईल." nibbāna(निब्बाण) चे कुणी अनुभव घेवू शकत नाही जोपर्यंत सर्वांत दृढ saṅkhārā(संस्कार) समाप्त केला जात नाही – ज्यातील एक पुढील जीवन खालील स्वरुपात अस्तित्वात असेल, जेथे दुःखाचा प्रभाव असेल. भाग्यवश,जेव्हा एकजण विपश्यनेचा अभ्यास सुरु करतो,तेव्हा त्यातलाच एक saṅkhārā(संस्कार) प्रथम वर उठेल. जेव्हा एकजण समतेमध्ये राहतो तेव्हा ते नष्ट होत जातात. जेव्हा सर्व प्रकारचे saṅkhārā(संस्कार) नष्ट होऊन जातात,तेव्हा स्वाभाविकच nibbāna(निब्बाण) चा पहिल्या प्रथमच अनुभव येतो. ह्या अनुभवानंतर एकजण पूर्णपणे बदलून जातो,आणि आता तो असे कोणतेही काम करणार नाही जे त्यास  पुढील जन्म खालील योनिमध्ये जन्म देईल. हळू हळू एकजण तेव्हाच उच्च अवस्थेपर्यंत पोहोचतो,जेव्हा सर्व संस्कार जे त्याला पुढील भविष्यकालीन जीवन विश्वामध्ये देणारे saṅkhārā(संस्कार)नष्ट होत नाहीत. अशी व्यक्ति पूर्णपणे मुक्त झाली आहे आणि म्हणुनच बुध्दाने शेवट केला,“ मन आणि शरीराची सारी सत्यता समजून,जेव्हा तो मरण पावतो तेव्हा स्थापित विश्वापलिकडे निघून जातो,कारण की त्याने संवेदनेस पूर्ण प्रकारे समजून घेतले आहे”.

आपण संपूर्ण शरीराच्या संवेदनेबद्दल सजगता ठेवण्याच्या अभ्यासाद्वारे ह्या मार्गावर एक छोटीशी सुरुवात केली आहे. जर आपण त्या संवेदनेवर प्रतिक्रिया न करण्याची सावधानता ठेवली,तर आपल्या लक्षांत येइल की जुन्या saṅkhārā(संस्कार) चे थरावर थर नष्ट होत आहेत. स्थूल,अप्रिय संवेदनेप्रति समता ठेवूनच आपण सूक्ष्म,सुखद संवेदनेचा अनुभव घेण्यासाठी पुढे जाऊ शकाल. जर आपण सजगता ठेवलीत तर,आता किंवा नंतर आपण बुध्दांनी वर्णन केलेल्या स्थितीपर्यंत पोहोचाल,ज्यामध्ये साऱ्या शरीराच्या चौकटीमध्ये साधकाला उत्पन्न आणि नष्ट होणाऱ्या संवेदनेच्या अनुभवा शिवाय कोणताच अनुभव येत नाही. सर्व स्थूल,घनीभूत संवेदना वितळून गेल्या आहेत; पूर्ण शरीरभर सूक्ष्म संवेदनेशिवाय दुसरे काहीही नाही. स्वाभाविकपणे ही स्थिति पुष्कळच सुखकारक आहे, तरीसुध्दा आता हे अंतीम लक्ष नाही,आणि एखाद्यास ह्याची आसक्ति नसली पाहिजे. स्थूल संवेदना काढून टाकली आहे, तरी अंतर्मनात खोलवर आतासुध्दा दुषितता बाकी आहे. जर एकाने समतेने निरिक्षण चालू ठेवले,तर एका पाठोपाठ एक सर्व खोलवरील saṅkhārā(संस्कार)उत्पन्न होतील आणि नष्ट होतील. जेव्हा ते सारे नष्ट होतील, तेव्हा त्यास शाश्वततेचा अनुभव – मन व शरीरापलीकडे जे काही आहे,जेथे काहीच उत्पन्न होत नाही,म्हणूनच काहीही नष्ट होत नाही -- nibbāna(निब्बाण)ची अवर्णनीय अवस्था.

प्रत्येक व्यक्ति जी सजगता व समता ठेवून योग्य प्रकारे काम करेल ती निश्चितच ह्या अवस्थे पर्यंत पोहोचेल; अर्थात प्रत्येक व्यक्तिला स्वतःच काम करावे लागेल.

जसे इथे पाच शत्रू आहेत, पाच अडथळे जे आपल्या मार्गावरील प्रगतीमध्ये बाधा आणतात, तेथेच पाच मित्रसुध्दा आहेत, मनाच्या पाच हितकारक आंतरिक शक्ति, ज्या आपल्यास मदत व सामर्थ्य देतात. जर आपण ह्या मित्रांना शुध्द आणि मजबूत ठेवले तर कोणताही शत्रू आपल्यास चीत करु शकणार नाही.

पहिला मित्र श्रध्दा,भक्ति,विश्वास आहे. नेहमी संशय व अविश्वासामुळे अशांत राहिल्याने, विश्वासाशिवाय कुणी काम करु शकत नाही. तथापि, जर अंधविश्वास असेल, तर तो एक मोठा शत्रू आहे. जर एक आपली विवेकबुध्दी. खरी भक्ति काय आहे ह्याची योग्य समज घालवून बसतो, तेव्हा तो आंधळा होऊन जातो. कुण्या एकाचा देवता किंवा संत व्यक्तिमध्ये विश्वास असू शकतो,परंतु जर तो विश्वास खरा, योग्य समजुतीने असेल, तर त्याला त्या व्यक्तिमधील चांगल्या गुणाची आठवण होइल, आणि त्या सद्गुणांचा आपल्यामध्ये विकास करण्याची प्रेरणा तो घेईल. ह्या प्रकारची भक्ति अर्थपूर्ण व उपयोगी आहे. परंतु जर कुणी ज्या व्यक्तिबद्दल भक्ति आहे त्या व्यक्तिच्या गुणांचा अंगिकार करण्याचा प्रयत्न करणार नाही, तर तो अंधविश्वास आहे,जो पुष्कळच हानिकारक आहे.

उदाहरणार्थ, जेव्हा कुणी बुध्दास शरण जातो, तेव्हा त्याने बुध्दाच्या गुणांचे स्मरण ठेवले पाहिजे, आणि आपल्यामध्ये त्या गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुध्दाचा प्रधान गुण आत्मज्ञान आहे; म्हणूनच खरे तर हे आत्मज्ञानाला शरण आहे, आत्मज्ञान जे आपल्यामध्ये विकसित करायचे आहे. जो कुणी पूर्ण आत्मज्ञानापर्यंत पोहोचला आहे त्याला एकजण सन्मान देतो; म्हणजेच,जेथे कुठे गुणवत्ता प्रकट होऊ शकते,कोणत्याही एका विशेष संप्रदाय किंवा व्यक्तिला सापेक्ष न ठेवता तो त्या गुणवत्तेलाच महत्व देतो. आणि कुणी एक बुध्दाचा सन्मान करतो, तो कर्मकांड किंवा शिष्टाचाराने नाही,तर त्यांच्या शिकवणीचा अभ्यास करुन, पहिले पाऊल धम्माच्या मार्गावर टाकून, sīla(शील), पासून samādhi (समाधि ), पासून paññā(प्रज्ञा) , पासून nibbāna(निब्बाण ), मुक्ती साठी.

जो कुणी बुध्द होतो त्यामध्ये खालील गुण असणे आवश्यक आहे. त्यांनी सर्व राग(आसक्ति), द्वेष,अज्ञान नष्ट केले असले पाहिजे. त्यांनी सर्व शत्रू, आपले आंतरिक  शत्रू म्हणजेच मानसिक दुषिततेवर विजय मिळविला असला पाहिजे. त्याने फक्त धम्माच्या सिध्दांतामध्ये पारंगत नसले पाहिजे तर त्याचा व्यवहारामध्ये उपयोग करण्यामध्ये देखील असला पाहिजे. तो जे शिकवितो ते आचरणात आणतो,जसे आचरण करतो तसेच शिकवितो; त्याच्या उक्ति आणि कृती मध्ये काहीच अंतर नसते. प्रत्येक पाऊल जे तो टाकतो ते उचित असते, उचित दिशेने पुढे जाण्यासाठी. त्यांनी आपल्या आंतरिक ब्रह्मांडाच्या शोधाद्वारे पुऱ्या ब्रह्मांडाबद्दल सर्व काही जाणले आहे. त्यांच्या मध्ये प्रेम,करुणा,दुसऱ्याबद्दल अनुकंपित आनंद उचंबळतो, आणि जे लोक खरा मार्ग शोधण्यासाठी भटकत आहेत त्यांना खरा मार्ग शोधण्यामध्ये मदत करतात. तो पूर्णपणे समते मध्ये पारंगत आहे. जर कुणी ह्या गुणांचा अंतिम ध्येयाकडे पोहोचण्यासाठी आपल्या मध्ये विकास करण्यासाठी काम करीत असेल तरच त्याचा बुध्दाला शरण जाण्यात काही अर्थ आहे.

तसेेच धम्माला शरण जाण्याचे संप्रदायिकतेशी काही देणे-घेणे नाही.  हा एका संगठित धर्मापासून दुसऱ्या धर्मामध्ये जाण्याचा विषय नाही. धम्माला शरण जाणे वास्तवामध्ये सदाचाराला शरण जाणे आहे, आपल्या मनावर ज्ञानपूर्ण  प्रभुत्व मिळविणे आहे. एक शिकवणूक धम्म होण्यासाठी, त्यात काही गुण असणे आवश्यक आहे. सर्वात आधी ती स्पष्टपणे समजावून सांगितली गेली पाहिजे, जेणेकरुन कोणीही ती शिकवणूक समजू शकेल. ह्यातली वास्तविकता अनुभवली पाहिजे, ही एक कल्पना नव्हे हे आपण आपल्या दृष्टीने स्वतः पाहिले पाहिजे. इतके की, nibbāna(निब्बाण) चे सत्य जोपर्यंत अनुभवले नाही तोपर्यंत त्याचाही स्वीकार करू नका. धम्मचे लाभदायक परिणाम येथे व  आत्ताच मिळाले पाहिजेत, केवळ भविष्यातील सुखे मिळण्याचे  आश्वासन ते  नाही. ह्या मध्ये “ या आणि पहा” ची गुणवत्ता आहे; स्वतः पहा, आपण स्वतः करा,अंधपणे स्विकारु नका. आणि एकदा का ते करुन पाहिले व त्यातील फायद्याचा अनुभव घेतला की दुसऱ्याना प्रोत्साहित करणे व त्यांना येऊन अनुभवण्यास मदत करणे त्याचबरोबर तसे पहाण्यासाठी सांगितल्याशिवाय राहवत नाही. ह्या मार्गावरील प्रत्येक पाऊल अंतिम ध्येयाच्या जवळ घेउन जाते; कोणताही परिश्रम वाया जात नाही. धम्माची सुरुवात, मध्यम, आणि अंततः फायद्याचीच आहे. शेवटी, सामान्य बुध्दीची कोणतीही व्यक्ती, कोणत्याही पार्श्वभूमीची असो, ह्याचा अभ्यास करू शकते आणि त्यापासून लाभाचा अनुभव घेऊ शकते. हे वास्तवामध्ये काय आहे ते समजावून घेऊन जर कुणी धम्माला शरण जाऊन त्याचा अभ्यास सुरू करेल, तर त्या भक्तीला अर्थ आहे.

त्याच प्रकारे, संघाला शरण जाणे म्हणजे एका संप्रदायात सामील झालात असे नाही. जो कुणी ही sīla(शील), samādhi(समाधि), आणि paññā(प्रज्ञा) च्या मार्गावर चालतो आणि जो मुक्तिच्या मार्गावर कमीत कमी पहिल्या चरणावर पोहोचला आहे, जो सदाचरणी(संत) व्यक्ति झाला आहे, तो संघ आहे. तो किंवा ती कुणीही असो,दिसण्यात कसाही असो,कोणताही रंग,कोणत्याही पार्श्वभूमीचा असो; त्याने फरक पडत नाही. एखादा जेव्हा अशा व्यक्तिला पाहून प्रेरित होतो व त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी काम करतो, तेव्हा त्याच्या धम्माला शरण जाण्यास अर्थ आहे,खरी भक्ति आहे.

प्रयत्न एक आणखी मित्र आहे. विश्वासाप्रमाणे, तो अंध नसला पाहिजे. नाहीतर एखाद्यास चुकीच्या पध्दतीने काम करण्याचा धोका उत्पन्न होऊ शकतो, त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. प्रयास कुणी कसे काम करावे ह्या योग्य समझदारीने झाला पाहिजे; त्यानंतर तो प्रगतीसाठी पुष्कळच उपयोगी होइल.

एक आणखी मित्र आहे सजगता. सजगता केवळ वर्तमान क्षणाचे सत्य असू शकते. एकास भूतकाळाचा पत्ता नसू शकतो, एकजण फक्त त्यास आठवू शकतो. एकास भविष्याबद्दल काही माहीत नसण्याची शक्यता असू शकते, एकास त्याची आकांक्षा किंवा भीती असू शकते. एकास वर्तमान काळातील आपल्या आंत जे सत्य प्रकट होत आहे त्याची माहिती करुन घेण्याची क्षमता विकसित केली पाहिजे.

पुढील मित्र आहे एकाग्रता, सत्यास कोणताही विराम न देता प्रत्येक क्षण त्यास पहात राहून त्यास ओळखणे. हे सर्व सगळ्या कल्पनाशक्ती, सगळे राग(आसक्ति), सगळा द्वेष यापासून मुक्त असले पाहिजे; त्यानंतरच ही खरी एकाग्रता असेल.

आणखी पाचवा मित्र ज्ञान-बुध्दी. ही प्रवचन ऐकून,पुस्तके वाचून,किंवा बौध्दिक विश्लेषण करण्याने आलेली नव्हे;एकास आपल्या अनुभवाद्वारे आपल्यामधील ज्ञानाचा विकास करायला हवा, कारण की केवळ ह्या अनुभवात्मक ज्ञानानंतरच एकजण मुक्त होऊ शकतो.आणि खऱ्या ज्ञानासाठी ते संवेदनेच्या आधारेच मिळविले पाहिजेः एकजण संवेदने प्रति त्याचा नश्वर स्वभाव ओळखून समतेमध्ये रहातो. ही समता खोलवरील मनाची आहे, जी एकास दैनिक जीवनातील सर्व स्थित्यंतरामध्ये संतुलित ठेवण्यास सक्षम होण्यास मदत करेल.

एकाने संतुलित मन ठेवून सांसारिक जबाबदारी पूर्ण करीत, आपल्यास शांतिपूर्ण व दुसऱ्यांना शांतिपूर्ण आणि सुखी करणे,योग्य प्रकारे जगण्यास सक्षम करणे हा विपश्यनेचा अभ्यास करण्याचा उद्देश आहे. जर आपण पाच मित्र मजबूत ठेवले तर आपण जीवन जगण्याच्या कलेमध्ये परिपूर्ण व्हाल आणि एक सुखी,स्वस्थ,चांगले जीवन जगाल.

चांगल्यासाठी व आपल्यासाठी आणि इतरांसाठीच्या लाभासाठी धम्माच्या मार्गावर प्रगती.

त्यांच्या दुःखातून बाहेर येण्यासाठी आणि खऱ्या सुखाचा आनंद घेण्यासाठी सर्व पीडित प्राणी शुध्द धम्माच्या संपर्कात येवोत.

सर्वांचे मंगल होवो!